प्रा. डॉ. किशोर म्हेत्री;बांदा येथे महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री जयंती साजरी
⚡बांदा ता.०३-: महात्मा गांधी यांनी आफ्रिकेत वर्णद्वेषाच्या विरोधात आंदोलन सुरु केले. भारतात आल्यानंतर स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय सहभाग घेतला. कोणतेही शस्त्र हातात न घेता अहिंसेच्या मार्गाने ब्रिटीश शासनाच्या विरोधातआंदोलन उभे केले. स्वातंत्र्य लढ्याला जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त करून देण्याचे महत्त्वाचे कार्य महात्मा गांधीनी केले. महात्मा गांधीनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम केले. त्यांनी इंग्रजांविरुद्ध असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, दांडी येथील मीठाचा सत्याग्रह, भारत छोड़ो आंदोलन इत्यादी महत्त्वपूर्ण आंदोलने केली. अखेर अथक प्रयत्नांमुळे १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. अशा या महान नेत्याची केवळ जयंती साजरी करून देशाचा विकास होणार नाही तर आजच्या पिढीने त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन बांदा यथील गोगटे वाळके महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. किशोर म्हेत्री यांनी महात्मा गांधी जयंती समारंभ प्रसंगी केले. . माजी पंतप्रधानलाल बहाद्दूर शास्त्री यांच्या कार्याचा आढावा डॉ. म्हेत्री यांनी घेतला.
येथील गोगटे वाळके महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमानेमहात्मा गांधी जयंती आणि माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर होते.
महात्मा गांधी हे सत्यनिष्ठ होते. त्यीनी दलितांसाठी फार मोठे कार्य केले. त्यांची स्वयंपूर्ण खेड्याची संकल्पना आजेही महत्त्वपूर्ण ठरते. लोकांची मने बदलण्याचे कार्य गांधीनी केले. आज केवळ भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला गांधींशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन डॉ. काजरेकर यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना केले.सांस्कृतिक वभाग प्रमुख प्रा.डॉ. एन.डी. कार्वेकर यांनी माजी पंतप्रधानलाल बहाद्दूर शास्त्री यांच्या कार्याचे विविध पैलू उलगडून दाखविले. याप्रसंगी प्राचार्यांच्या हस्ते महात्मा गांधीआणि लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यार आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एस.पी. वेल्हाळ यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ.एम.एन वालावलकर यांनी मानले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रमाकांत गावडे यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
