कुडाळ येथे भाजपच्यावतीने महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात धडक….

राज्य सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी

💫कुडाळ दि.१९-: कोरोना काळातील वीज बिल तसेच वाढीव वीज बील माफ करण्याच्या मागणीसाठी आज
भाजपच्यावतीने जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात धडक देण्यात आली. यावेळी कार्यालयासमोर वीज बिलाची होळी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी रोकताना पदाधिकारी व पोलिस यांच्यात झटापट झाल्याने वातावरणात काही काळ तंग बनले. यावेळी आंदोलनकर्त्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
राज्याचे वीज मंत्र्यांनी, दिवाळीपर्यंत वीज बिल माफ होईल, असे सांगितले. पण दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी वीज बिल माफी महावितरणला देणे शक्य होणार नाही, असे सांगितल्याने त्यांच्या या निर्णयाच्या विरोधात व वीजबिल माफीची रास्त मागणी करण्यासाठी जिल्हा भाजपाने आपल्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचीसहित आज महावितरण यांच्या कार्यालयाला धडक देत आंदोलन केले. यावेळी सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ वीज बिलांची होळी केली. हे आंदोलन भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, सभापती नूतन आईर, नगराध्यक्ष ओंकार तेली, महीला मोर्चा प्रमुख संध्या तेरसे, जिल्हा पदाधिकारी राजू राऊळ, जिल्हा सेक्रेटरी बाळू देसाई, दीपक नारकर, भाई सावंत, कुडाळ शहर अध्यक्ष राकेश कांदे, अविनाश पराडकर, अस्मिता बांदेकर, मोहन सावंत, ऍड. बंड्या मांडकूलकर, संजय वेंगुर्लेकर, किशोर मर्गज, अभय परब, गोपाळ हरमलकर, पप्या तवटे, महिला आरती पाटील, धोंडी चिंदरकर, संदीप मेस्त्री, राजा धुरी, राजेश पडते, संदेश नाईक, स्वप्ना वारंग, सुप्रिया वालावलकर, आश्विन गावडे, सुनील बांदेकर उपस्थित होते.
या आंदोलनावेळी राजन तेली तसेच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी वीज वितरणचे अधिक्षक अभियंता विनोद पाटील यांना धारेवर धरले. यावेळी तेली यांनी सांगितले की, कोरोना महामारीमुळे करण्यात आलेल्या तीन ते चार महिन्यातील लाॅकडाऊनमुळे सर्व जनता या काळात घरी होती.

या काळात कोणाच्याही हाताला काम नव्हते, अनेकांचे रोजगार गेले, नोकऱ्या गेल्या, व्यवसाय ठप्प झाले. अशा वेळी पैशाची आवक बंद झाल्यामुळे एकदम आलेले तीन महिन्याचे वीज बिल भरण्याची आर्थिक ताकद बऱ्याच या वीज ग्राहकांची नाही. त्यामुळे अनेक राज्यात कोरोना काळातील वीज बिल माफ करण्यात आले आहे, असे असताना महाराष्ट्रात वीज बिल माफी का नाही, दिवाळीपूर्वी विज बिले माफ करण्याची घोषणा करणारे वीज मंत्री आता विज बिले माफ होणार नाहीत हे कसे काय सांगतात, जनतेने काय करायचे असे प्रश्न उपस्थित करीत येथील जनता वाढीव वीज बील भरणार नाही, तसेच आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेकडून वीज बील वसुलीची सक्ती केल्यास किंवा त्यांचा वीज पुरवठा खंडीत केल्यास तसेच सरकारने वीज बिल माफी देण्यासंदर्भात कुठलेही पाऊल उचलले नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन भाजपाच्यावतीने विद्युत ग्राहकांसह छेडण्यात येईल, असा इशारा भाजपाच्यावतीने जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी वीज वितरण विभागाचे अधिक्षक अभियंता विनोद पाटील यांना दिला.।हे आंदोलन छेडल्या प्रकरणी राजन तेली, समिधा नाईक, रणजित देसाई, ओंकार तेली, संध्या तेरसे यांच्यासह ३५ जणांना ताब्यात घेऊन त्यांना कुडाळ पोलिस ठाण्यात आणत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना सोडण्यात आले.

या आंदोलनप्रसंगी राज्य सरकार, मुख्यमंत्री, वीज मंत्री यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येवुन वीज बील प्रश्नी निषेध करण्यात आला.।यावेळी भाजपाच्या वतीने विनोद पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पाटील यांनी किमान सव्वा महीना तरी कोणत्याही ग्राहकाला वीज बिलाची सक्ती करणार नाही. यानंतर प्रशासनाच्या आदेशानुसार बील वसुली केली जाईल,।असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले.
आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडु नये या करीता कुडाळ पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

You cannot copy content of this page