⚡कणकवली ता.०३-: कणकवली तालुक्यातील कसवण तळवडे ग्रामपंचायतची ग्रामसभा नुकतीच संम्पन्न झाली यावेळी ग्रामसभेत तटामुक्ती अध्यक्ष म्हणून माजी सरपंच तसेच श्री रवळनाथ विकास सेवा सोसायटी संचालक श्री बापूशेठ गोपाळ कसवणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी सरपंच सौ. गीता प्रमोद तेली, उपसरपंच गोपीनाथ सावंत, श्री रवळनाथ विकास सेवा सोसायटी चेअरमन व ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सावंत, माज़ी सरपंच यशोधन सर्पे, शाळेचे मुख्याध्यापक व ग्रामस्थ उपस्थित होते.
