निरवडे येथील कुटुंबाला म्हापसा येथील नगरसेवकांकडून आर्थिक मदत

⚡सावंतवाडी ता.०३सहदेव राऊळ -: निरवडे पलतडवाडी येथील शाळकरी मुलगा सुयोग संतोष मुळीक हा गेली दोन वर्षे दुर्धर आजाराने त्रस्त आहे. त्याच्या आजारपणाच्या खर्चासाठी निरवडे सरपंच हरि वारंग यांचे मित्र असलेले म्हापसा गोवा येथील नगरसेवक स्वप्निल शिरोडकर व तारक आरोलकर यांना निरवडे सरपंच यानी मुळीक कुटुंबियाना मदत करण्याची विंनती केली होती. त्यामुळे त्यानी रोख २५००० रुपयांची मुळीक यांना मदत केली. सरपंच हरि वारंग यांनी दोन्ही नगरसेवकांचा सत्कार केला व आभार मानले.

यावेळी माजी सरपंच सदा गावडे, उपसरपंच चंद्रकांत गावडे, ग्रामपंचायत सदस्य शिल्पा सावळ, अर्जुन पेडणेकर, सुरेखा बोंद्रे, सुप्रिया निरवडेकर, महिला बालकल्याण मुख्य सेविका मोरे, न्हावेली ग्रामसेवक तृप्ती राणे, तसेच ग्रामस्वच्छता अभियान आढावा सभेसाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page