सत्ताधारी-विरोधकांचे एकमुखी समर्थन : जमीन संपादनासाठी ४० कोटी रुपये निधी आवश्यक ;तर रस्ता मळेवाड, न्हावेली, निरवडे असा न गेल्यास जनआंदोलन उभारू : हेमंत मराठे यांचा इशारा_*
*💫सावंतवाडी दि.०१-:* संकेश्र्वर बांदा हा महामार्ग सावंतवाडीतून जावा अशी मागणी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली असता, याला सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमुखी समर्थन देत माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांच्याकडे मागणी केली आहे. यासाठी आवश्यक असलेले नियोजन करण्यासाठी धोरण ठरवून जमीन संपादन करण्यासाठी ४० कोटी रुपये निधी आवश्यक असून, तो देण्याचा प्रयत्न करू असे आमदार दिपक केसरकर यांनी सांगितले आहे. यावेळी मळेवाड ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य हेमंत मराठे यांनी हा रस्ता मळेवाड, न्हावेली, निरवडे असाच जावा अन्यथा जनआंदोलन उभारू असा इशारा आमदार दिपक केसरकर यांना दिला आहे. यावेळी आमदार केसरकर यांनी तालुक्याला मंजूर झालेले स्पोर्ट्स सेंटर सावंतवाडीत करावे की नाही, यासाठी नगरपालिकेने ठराव घ्यावा असे सांगत हे सेंटर बांदा येथे होण्यासाठी आपल्याकडे मागणी होत असल्याचे ते म्हणाले आहेत. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, सर्व नगरसेवक आदी उपस्थित होते.
