भाजपा आमदार नितेश राणे;हरकुळ बुद्रुक वासीयांना दिला विकासकामे करून देण्याचा विश्वास
*💫कणकवली दि.३१-:* उपकार हा शब्द तुमच्या आमच्यात नात्यात येता नये.मी तुमचा हक्काचा आमदार आहे.मुलगा, भाऊ या नात्याने हक्काने हाक द्या,कामे सांगा मी ती पूर्ण करेन असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी हरकुळ बुद्रुक वासीयांना दिला. भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षण क्षेत्रात जेवढे काम करू तेव्हढे कमीच आहे. अंजुमन ई खुद्दामूल मुस्लिमीन हायस्कुल,हरकुळ बुद्रूकला दिलेल्या स्कुलबस मुळे मुलांचा प्रवास सुखकर होईल याचे मला समाधान असल्याचे प्रतिपादन भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले. अंजुमन ई खुद्दामूल मुस्लिमीन हास्कुल,हरकुळ बुद्रूकला आमदार नितेश राणे यांनी स्वखर्चाने नविकोरी १५ सीटर टेम्पो ट्रॅव्हलर स्कुलबस दिली. स्कुलबसचे लोकार्पण आमदार नितेश राणे यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष शहानवाज आदम खान,यांच्या कडे स्कुलबस ची चावी देऊन करण्यात आले. यावेळी आयोजित सोहळ्यात आमदार राणे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश सावंत,हायस्कुल चे अध्यक्ष शहानवाज आदम खान,उपसभापती सौ.दिव्या पेडणेकर,माजी पं स सभापती बाबा वर्देकर,सरपंच गौसीया पटेल,.चेअरमन रईस पटेल,भाजपा कणकवली मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,माजी उपसभापती बुलंद पटेल, राजू पेडणेकर,रमेश पावसकर,उपसरपंच चंद्रकांत परब, बाळा गावकर,रजाक बटवाले,मुख्याध्यापक नश्रीम डांगे,शहानवाज डांगे,आदी उपस्थित होते. मी राणेंचा चेला आहे.राणे साहेबांवर निष्ठा ठेवून असणाऱ्या लोकांना सांभाळणं, त्याच्या अडचणी सोडविणे हेच आमचे काम आहे.त्यांनी केलेल्या शिकवणी नुसार आम्ही सर्व कार्यकर्ते काम करतो.राणे साहेबांकडून कैतुक झाले की काम करण्यास आणखीन हुरूप येतो.असे सांगताना आमदार श्री.राणे म्हणाले,शिक्षण, आरोग्य,आणि नोकरीत लोकांना फसवू नका, आणि हे प्रश्न जेव्हालोक घेऊन येतील तेव्हा कोणाला खाली हात जायला देऊ नका ही माजी मुख्यमंत्री राणे यांनी आम्हाला शिकवण दिली आहे. शिक्षण ही समाजाची खरी .त्यामुळेच आम्ही पोदार स्कुल कणकवलीत आणले, पडवेत मेडिकल कॉलेज , व्हॅस्पिटल उभे केले.त्यामुळे आमच्यावर टीका करणारे आणि विरोधात मते मागणारे यांनी आमच्या कामाची बरोबरी करून दाखवावी. एकादे काम नितेश राणे देऊ शकले नाहीत तर आपण करतो असे म्हणून विरोधक का पुढे येत नाही. हरकुळ विभागातील हा पट्टा राणेंना मानणारा आहे. त्यामुळे निवडणूक पाहून विकासाचे काम आम्ही कधीच करत नाही.आपल्या भागात डॉक्टर नाहीत.मेडिकल कॉलेज च्या माध्यमातुन दरवर्षी दीडशे डॉक्टर तयार होणार आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामीण भागातील डॉक्टर ची भासणारी उणीव येत्या काही दिवसात भरून निघेल.जिल्हात डॉक्टर बाहेरून आणावे लागणार नाहीत पडवे मेडिकल कॉलेज मध्येच डॉक्टर घडतील आणि जिल्ह्याची सेवा करतील असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. यावेळी बोलतांना माजी उपसभापती बाबा वर्देकर म्हणाले आमदार नितेश राणे यांनी वचनांची पूर्तता केली आहे.अंजुमन संस्था स्वतःची समजून राणे कुटुंब काम करत आहेत.हरकुळ बुद्रुक गावावर त्यांचे असलेले प्रेम पाहता गावाचा सर्वांगीण विकास नक्कीच करतील. बुलंद पटेल म्हणाले,हरकुळ बुद्रूक गावच्या विकासासाठी आम.नितेश राणे यांनी नेहमी झुकते माफ दिले.या त्यांच्या प्रेमातून गाव उतराई होणार नाही.त्यांचेवर दुप्पट प्रेम करत राहील. संस्थेचे अध्यक्ष शहानवाज आदम खान म्हणाले ‘जे बोलले ते पूर्ण करणारे’व्यक्ती महत्व राणे आहेत. ऍड. रईस पटेल यांनी आभार व्यक्त करतांना १२ जानेवारी ला शब्द दिला आणि ३१ तारीखला स्कुलबस आमदार नितेश राणे यांनी दिली असे काम करणारा राजकीय नेता एकमेवाद्वितीय असल्याचे गौरवोद्गार काढले.
