निधी संकलनात जिल्हावासीयांनी हातभार लावावा ;आमदार नितेश राणे यांचे आवाहन;३ फेब्रुवारीपासून सिंधुदुर्गात कार्यक्रम
*💫कणकवली दि.३१-:* अयोध्येतील श्रीराममंदिर निर्माण निधी संकलन कार्यात जिल्हावासीयांचा हातभार असावा यासाठी आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून ३ फेब्रुवारीपासून रामरथ सिंधुदुर्गात दाखल होत आहे. श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र अयोध्या ट्रस्ट च्या माध्यमातून अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर श्रीराम मंदिर बांधण्याचे कार्य सुरू आहे. या राष्ट्रीय कार्यात सर्वसामान्य नागरिकांचाही सहभाग असावा यासाठी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान देशात श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियान सुरू आहे. सिंधुदुर्गातील जास्तीत जास्त जनतेने या कार्यात सहभागी व्हावे यासाठी आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून रामरथ दाखल होत आहे. ३ फेब्रुवारी रोजी कणकवलीत रामरथाचा शुभारंभ होईल. या रामरथाचे ४ फेब्रुवारी रोजी वैभववाडी तालुक्यात ५ आणि ६ फेब्रुवारी रोजी देवगड, ७ फेब्रुवारी रोजी मालवण, ८ फेब्रुवारी रोजी वेंगुर्ले, ९ फेब्रुवारी रोजी सावंतवाडी, १० फेब्रुवारी रोजी दोडामार्ग आणि ११ फेब्रुवारी रोजी कुडाळ तालुक्यात आगमन होणार आहे, अशी माहिती श्रीराम मंदिर निधी समर्पण समिती सिंधुदुर्गच्या वतीने देण्यात आली आहे.
