तांबुळी खालचीवाडीतील घरावर माड कोसळला

सुमारे लाखाचे नुकसान ; घराच्या दर्शनी भागासह पत्र्याची पडवी व लगतच्या गोठ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान

*💫बांदा दि.३१-:* तांबुळी – खालचीवाडी येथील कृष्णा गोविंद सावंत यांच्या घरावर माड उन्मळून पडल्याने नुकसान झाले आहे. घराच्या दर्शनी भागासह पत्र्याची पडवी व लगतच्या गोठ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात पत्रे, मंगलौरी कौले, वासे व अन्य सामानांची नासधूस झाली आहे. या दुर्घटनेत सावंत यांचे सुमारे १ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोमवारी सकाळी महसुल प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामा करण्यात येणार असून त्यानंतर नेमका नुकसानीचा आकडा प्राप्त होणार आहे. याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत यांनी दिली.

You cannot copy content of this page