Headlines

३६५ खेड्यांचा अधिपती असलेल्या उपरलकर देवस्थानचा ४ फेब्रुवारी रोजी वार्षिक अभिषेक पूजा सोहळा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमावलीचे पालन करून होणार साजरा

*💫सावंतवाडी दि.३१-:* महाराष्ट्र व गोवा राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सावंतवाडी शहराचे जागृत देवस्थान व ३६५ खेड्यांचा अधिपती असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा सोहळा गुरुवार ४ फेब्रुवारी रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमावलीचे पालन करून साजरा होणार आहे. सावंतवाडीतील राज घराण्याचे दैवत असलेल्या या देवस्थानचा वाढदिवस दरवर्षी मोठा उत्सव म्हणून साजरा होतो. यावषीर्ही त्यानिमित्त सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी अभिषेक व पूजा, उत्सवानिमित्त पूजापाठ, त्यानंतर सर्व भाविकांना दर्शन व तीर्थप्रसाद, त्यानंतर नामांकित भजनी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ७ वाजता सावंतवाडीतील महापुरुष दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर भाविकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व कोरोना नियमावलीचे पालन करून या कार्यक्रमाला सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देव उपरलकर देवस्थानचे मानकरी विद्याधर नाईक-शीतप व शुभम नाईक-शितप यांनी केले आहे

You cannot copy content of this page