*💫मालवण दि.३१-:* महाराष्ट्र मंडळ- सिंगापूरच्या शब्दगंध मंचाच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘शब्दगंध-२०२१, सिंगापूर’ कवितासंग्रहाचे प्रकाशन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले हे प्रकाशन सुप्रसिद्ध लेखिका-कवयित्री गौरी कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी शब्दगंध समितीचे सदस्य अरुण मनोहर, श्रीरंग केळकर, नंदकुमार देशपांडे, प्रतिमा जोशी, नंदिनी नागपूरकर, मोहना कारखानीस आणि महाराष्ट्र मंडळ-सिंगापूरचे अध्यक्ष आशिष पुजारी उपस्थित होते. गौरी कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात कवितेसंबधी मार्गदर्शन केले. यानंतर ३८ कवींच्या निवडक कवितांच्या काव्य वाचनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे विशेष म्हणजे यात सिंगापूर, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मलेशिया आणि भारत देशात वास्तव्यास असलेल्या शब्दगंधियांनी स्वरचित कविता वाचून हा कार्यक्रम रंगतदार केला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहना कारखानीस यांनी केले. शब्दगंध २०२१,सिंगापूर या कवितासंग्रहात ३८ विविध देशात स्थित असलेल्या शब्दगंधियांच्या १४० कविता असून प्रत्येक कवितेला समर्पक असे चित्र कवी, चित्रकार श्रीरंग केळकर यांनी काढले आहे. तर अनेक दिग्गज साहित्यिकांच्या शुभेच्छा या कविता संग्रहाला लाभल्या आहेत. हा सोहळ्याचे संपूर्ण चलचित्रांकन युट्ययुबवर आणि फेसबुकवर बघायला मिळेल.
‘शब्दगंध २०२१ सिंगापूर’ कवितासंग्रहाचे प्रकाशन…
