आम्ही सावंतवाडीकर यांचे आयोजन;महिलांना मोफत प्रवेश
⚡सावंतवाडी ता.२३-: शहरात आम्ही सावंतवाडीकर यांच्या वतीने नवरात्रौत्सवाचे औचित्य साधत खास महिलांसाठी 30 सप्टेंबर रोजी वैश्य भवन येथे सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत ओपन गरबा आणि दांडिया यांचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाला महिलांना मोफत प्रवेश देण्यात येणार असून, शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही सावंतवाडीकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महेश 9545472152, संजना 9049401629 , चित्रा 7385336014 यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
