बांदा-गडगेवाडीतील ‘त्या’ ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करू नका

सामाजिक कार्यकर्ते संदेश महाले : स्वखर्चाने भरणा केले वीज बिल

⚡बांदा ता.२३-: बांदा-गडगेवाडी येथील मनोज बांदेकर यांचे सहा महिन्यांचे वीज बिल आर्थिक परिस्थितीमुळे थकीत होते. वीज कर्मचारी त्यांचे वीज कनेक्शन कापण्यासाठी आले होते. परंतु तेथील सामाजिक कार्यकर्ते संदेश महाले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत श्री.बांदेकर यांचे बिल स्वखर्चाने भरून सामाजिक बांधिलकीचा एक पायंडा घालून दिला आहे. त्यामुळे मनोज बांदेकर यांच्या घराचे वीज कनेक्शन कायम राहिले.

गेले पाच-सहा महिने मनोज बांदेकर आपल्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे वीजबिल भरणा करु शकले नाही. त्यामुळे नाइलाजास्तव बांदा सहाय्यक अभियंता एस. आर. कोहळे यांनी सदर ग्राहकांचे वीज कनेक्शन बंद करण्याचे आदेश दिले. याची खबर संदेश महाले यांना मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल होत स्वतःच्या पैशांनी थकीत असलेले वीजबिल भरले अन् मनोज बांदेकर यांचा वीजपुरवठा अखंडित राहिला.
दरम्यान, महावितरणला सहकार्य केल्याबद्दल सहायक अभियंता कोहळे यांनी संदेश महाले यांना धन्यवाद दिले.

You cannot copy content of this page