*केंद्रात व राज्यात मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा कोकणासह सिंधुदुर्गला करून देणार

खासदार सुरेश प्रभू यांची व्यापारी एकता मेळाव्यात ग्वाही

*💫सावंतवाडी दि.३१-:* कोकणच्या भल्यासाठी राज्यात आणि केंद्रात मिळालेल्या प्रत्येक संधीचा आपण प्रयत्न करत असून, मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा कोकणला व सिंधुदुर्गला करून देणार अशी ग्वाही खासदार सुरेश प्रभू यांनी सावंतवाडी येथे आयोजित व्यापारी एकता मेळाव्यास ऑनलाईन मार्गदर्शन करताना दिले आहे. यावेळी ते म्हणाले की, समाजाला, ग्राहकाला दिशा दाखवण्याचे कार्य व्यापारी वर्ग करत असतो. समाजात व्यापारी हा मोठे योगदान देऊन जातो. असे प्रतिपादन त्यानी यावेळी केले आहे. तसेच जिल्ह्यातील तरुणांना रोजगार प्राप्त व्हावा यासाठी मोठ्या कंपन्या येथील तरुणांना प्रशिक्षण देणार असल्याचे देखील सुरेश प्रभू म्हणाले आहेत.

You cannot copy content of this page