*नगराध्यक्ष संजू परब यांचे आवाहन
*💫सावंतवाडी दि.३१-:* नगराध्यक्ष संजू परब यांनी आज व्यापारी मेळाव्यास हजेरी लावत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, सावंतवाडीत व्यापारी मेळावा भरवल्याचा आनंद होतं आहे. यावेळी ते म्हणाले व्यापारी म्हटल की नफा आणी तोटा असतो तसेच कोरोना काळात आलेला संकट ते मी पाहिले तरी सुद्धा तुम्ही त्या जिदीने व्यापारी मेळावा करतात या कार्याला सल्लाम केला आहे. तसेच नगरपालिकेच्या वतीने मत्स्य महोत्सव घेत असून, या माध्यमातून भविष्यात अनेक जन व्यापारी म्हणून पुढे येतील. तसेच याबाबतची सर्व प्रकारची माहिती देण्यात येईल असे ते यावेळी म्हणाले आहेत. तसेच सावंतवाडी तालुक्यातील व्यापाऱ्यांनी जो बहिष्कार घातला तो वैचारिक मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे असे आवाहन संजू परब यांनी केले आहे.
