श्री. दिलीप गिरप ; वेंगुर्ला शहरात हरितक्रांतीद्वारे अधिकचा विकासाचे ध्येय..
⚡वेंगुर्ला ता.०५-: वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत एकाच दिवशी 500 वृक्षलागवड करण्यात आली.जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. 5 जून 2026 रोजी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक प्रत्येकी 10 याप्रमाणे ( एकूण 230) व नगरपरिषद अधिकारी – कर्मचारी प्रत्येकी 10 प्रमाणे असे एकूण सर्व 500 वृक्ष लागवड वेंगुर्ला कॅम्प येथे करण्यात आली.1 वर्ष कालावधीत या वृक्षाची जतन करावयाची असून पुढील वर्षी 5 जून, 2027 रोजी प्रथम 5 क्रमांकाना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. या संपूर्ण वर्षात वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत शासनामार्फत नगरपरिषद कार्यक्षेत्रात 25 हजार वृक्ष लागवडचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पुढील वर्षी 5 जून 2027 पासून सर्व नागरिकांसाठी ही वृक्ष लागवड संकल्पना सुरु ठेवण्यात येणार आहे.तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत सकाळी ७ वाजता नवाबाग बीच येथे झुलता पूलापासून महा-स्वच्छता मोहीम पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी राबविण्यात आली. या मोहिमेत नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, विविध विषय समिती सभापती, नगरसेवक व कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच वेंगुर्ला पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर प्रभावीपणे जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमानी साजरा करण्यात आला.
