दुचाकी चोरीनंतर चोरट्याची पाऊले बंद घरांकडे….
⚡वेंगुर्ला ता.०५-: वेंगुर्ला शहरातील वेंगुर्ला भटवाडी येथे अज्ञात चोरट्यामार्फत गुरुवारी रात्री घराचे कुलूप तोडून घरफोडीचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान शेजारी यांच्या ही बाब निदर्शनास येताच घरमालक व वेंगुर्ला पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानुसार वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, तसेच पोलीस हवालदार भगवान चव्हाण, पोलीस हवालदार योगेश सराफदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संबंधित व्यक्ती (फिर्यादी) हे सुट्टीसाठी पुणे येथे गेले असता हा प्रकार घडला. याबाबत दाखल फिर्यादीनुसार वेंगुर्ला पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस हवालदार भगवान चव्हाण हे करीत आहेत.नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन पीआय निसर्ग ओतारी यांनी केले आहे.
