व्यापाऱ्यांना जीएसटीचा त्रास कमी व्हावा यासाठी आपले प्रयत्न सुरू

खासदार विनायक राऊत यांनी एकता मेळाव्यात दिली माहिती

*💫सावंतवाडी दि.३१-:* व्यापाºयांना जीएसटीचा त्रास कमी व्हावा, यातून व्यापाºयांची सुटका करावी यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत, सुलभ प्रणाली यात आणावी यासाठी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन व पंतप्रधान यांच्याकडे मागणी केली आहे. अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. सावंतवाडी येथील एकता मेळाव्यास खासदार राऊत यांनी आॅनलाईन भेट दिली. यावेळी राऊत म्हणाले, कोव्हिड वॅक्सिंनचा फायदा गोरगरीब ज्येष्ठ नागरिकांना मोफत द्यावं, पंतप्रधान यांच्याकडे मागणी केली. तसेच व्यापारी जीएसटीचा त्रास कमी व्हावा, यातून व्यापाºयांची सुटका करावी यासाठी प्रयत्न सुरू असून केंद्र सरकाने यात काही प्रमाणात सुधारणा केली आहे. सुलभ प्रणाली यात आणावी यासाठी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन व पंतप्रधान यांच्याकडे मागणी केली आहे. सुलभ कर प्रणाली लवकरच अंमलात येईल, महाराष्ट्राचे २५ हजार कोटी जीएसटीची रक्कम केंद्र सरकारकडे पेडिंग आहे. त्यामुळे राज्याच्या विकासावरही परिणाम झाला आहे. विजबिलातून व्यापारी व छोट्या व्यापाºयांना सूट देण्याचा प्रयत्न आहे, गेल्या आठ महिन्यात अतोनात नुकसान झाले, अशावेळी व्यापाºयांना सवलती देणे आवश्यक आहे, इव्हेशन इंडस्ट्री व हॉटेल इंडस्ट्री याना आर्थिक सहकार्य करण्याची गरज ओळखून बजेटमध्ये पण मी मागणी करणार आहे, कुडाळ आयकर कार्यालय कोल्हापूर येथे हलवण्यात येत होते ते थांबवले, कोकण टुरिझमचा चांगला प्लान तयार होईल, ताज हॉटेलची उभारणी पण लवकरच स्थानिक लोकांना संरक्षित करून कसे होईल त्यासाठी मुणगे, येथे दोन मिठबाव येथे एक, एकूण चार हॉटेल लवकरच जिल्ह्यात हॉटेल इंडस्ट्री येईल, रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल, विमानतळ सुरू करण्याबाबत सर्व केंद्रात अधिकारी यांच्याशी चर्चा सुरू आहे. आठवड्यातून तीन फ्लाईट उडतील एवढे प्रवासी आहेत. डिजीसीएची काही परवानगी आवश्यक असून पाठपुरावा सुरू आहे, विमानतळ रनवेच काम करून विमान वाहतूक सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल, कार्गो सर्व्हिस सुद्धा लवकरच सुरू होईल, असे राऊत यांनी सांगितले.

You cannot copy content of this page