पालकामंत्र्यानी दिला शब्द, जि प सदस्य अंकुश जाधव यांची माहिती
*💫दोडामार्ग दि.३०-:* झरेबांबर शेलपीवाडी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून काही वर्षापूर्वी रस्ता मंजूर होऊन काम झालेत त्यावेळी झरेबांवर नदीवर आवश्यक ठिकाणी पूल बांधण्यात आले होते त्याची उंची खूपच कमी असल्याने पावसाळ्यात वाहतूक बंद होते शिवाय अवघड वळण असल्याने अपघात होत आहेत. याबाबत माजी समाजकल्याण सभापती तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य यांनी २१/०१/२०२० च्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत मुद्दा उपस्थित केला होता. दरम्यान नुकत्याच २८/०१/२०२१ च्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत कार्यपूर्ती अहवाल वाचना वेळी जाधव यांनी पुलाचा विषय किती महत्वाचा आहे हे सभागृह आणि समिती अध्यक्ष यांच्या निदर्शनास आणून दिला. जाधव यांच्या मागणीला जी. प. उपाध्यक्ष तथा समिती सदस्य राजेंद्र म्हापसेकर यांनीही पाठिंबा सभागृहात दिला. समिती अध्यक्ष तथा पालकमंत्री यांनी शासनाच्या निधीतून झरेबांबर पुला साठी निधी उपलब्ध करून मिळेल असे सभागृहात स्पष्ट केले. लवकरच झरेबांबर येथे नवीन पूल होऊन पिकुळे, उसप, बोडदे,खोकरल,आदी गावातील लोकांना फायदा होणार आहे. अशी माहिती जाधव यांनी दिली.
