*💫सिंधुदुर्गनगरी दि.३१-:* जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात कोविना ची लस दाखल झाली. पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. अद्यापपर्यंत २५२३ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस टोचण्यात आली आहे. लस घेतलेल्याना कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम झालेला नाही. जिल्ह्यात लसीकरनाची टक्केवारी ६८ टक्के आहे. तर नजीकच्या रत्नागिरी जिल्ह्यात लसीकरणनाची टक्केवारी ५५.०८ टक्के आहे. जिल्ह्यात लस उपलब्ध झाल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्टाफ नर्स अलका सांगवेकर यांना केंद्रावर पहिल्यांदा लस टोचून जिल्ह्यातील कोवीड लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना लस दिल्यानंतर आता खासगी रुग्णालयातील डॉक्टर व नर्स व इतर कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. सुरुवातीला काही ठिकाणी लस घेण्यास कर्मचारी धजावत नव्हते, मात्र कर्मचाऱ्यां मधील गैरसमज दूर झाल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी लस घेतली. जिल्ह्यासाठी सिरम इन्स्टीट्यूट निर्मीत कोविशिल्ड लसीचे १० हजार २६० डोसेस उपलब्ध झाले होतेे. तसेच लसीच्या एक हजार २६ व्हायल्स तसेच इंजेक्शनसाठी १२ हजार ६०० सिरींज मिळाल्या होत्या. ही लस २ ते ८ सेंटिग्रेड तापमानास साठविली जाते. एक व्हायल ५ मि.ली. ची असून प्रत्येक व्यक्तीस 0.5 मि.ली. एवढा डोस देण्यात येत आला होता. या लसीचे दोन डोस घेणे गरजेचे आहेत. दोन डोसच्या मध्ये ४ ते ६ आठवड्यांचे अंतर असणार आहे. ज्या व्यक्तींना यापूर्वी कोणत्याही लसीची ॲलर्जी आहे, रक्तासंबंधी आजार आङेत, रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, गरोदर माता, स्तनदा माता यांना लस देताना विशेष काळजी घेण्यात आली. तर डोकेदुखी, उलटी, मळमळ, पोटदुखी, चक्कर येणे, सांधे दुखी, इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना, खाज येणे, पुरळ येणे हे लसीचे सर्वसाधारण दुष्परीणाम आहेत. परंतु यापैैकी कोणतेही दुष्परिणाम आढळून आले नाही. सुरुवातीच्या काळात सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्गनगरी सह उपजिल्हा रुग्णालय कणकवली व सावंतवाडी येथेही लसीकरणास सुरुवात झाली होती. त्यानंतर मात्र लसीकरण केंद्र वाढवण्यात आले. शिरोडा, मालवण, वेंगुर्ले येथे लसीकरण करण्यास मान्यता देण्यात आली. प्रत्येक केंद्रावर प्रत्येकी १०० लाभार्थींना लस देण्यात आली. पुढील चार आठवडे, प्रति आठवडा चार अशा प्रकारे एकूण १६ सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये ४ हजार ५०० लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणाच्या ठिकाणी ४ व्हॅक्सिनेशन ऑफिसर, २ व्हॅक्सिनेटर नियुक्त करण्यात आले आहेत.
सिंधुदुर्गात पहिल्या टप्प्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण 68 टक्क्यांवर
