*जास्तीत जास्त खेळाडूंनी उपस्थित राहण्याचे तालुका कबड्डी संघटनेचे आवाहन
*💫मालवण दि.२८-:* फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी निवड चाचणीमध्ये किशोर / किशोरी गट, कुमार / कुमारी गट आणि पुरुष महिला या तिन्ही प्रकारांसाठी मालवण तालुका कबड्डी संघ निवड चाचणी ३१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता येथील टोपीवाला हायस्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. निवड चाचणीसाठी जास्तीत जास्त कबड्डी खेळाडूंनी उपस्थित राहावे, सहभागी खेळांडूकडे मूळ आधारकार्ड असणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी तालुका संघटक नितीन हडकर, मंदार ओरसकर, सचिव रेनोल्ड बुतेलो-९४२३०५३१७१ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष बाबला पिंटो आणि उपाध्यक्ष उत्तम पेडणेकर यांनी केले आहे.
