मालवण दि मालवण तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत प्रक्रिया गुरुवारी मामा वरेरकर नाट्यगृहात तहसीलदार अजय पाटणे यांच्या उपस्थितीत पार पडली. यामध्ये सर्वसाधारण महिला राखीव २१, सर्वसाधारण २०, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव ९, नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण ९, अनुसूचित जाती ३, अनुसूचित जाती महिला राखीव २ आणि अनुसूचित जमाती १ ग्रामपंचायत असे सरपंच पदासाठी आरक्षण चिठ्ठी काढून जाहीर करण्यात आले. मामा वरेरकर नाट्यगृहात पार पडलेल्या ग्रामपंचायत सरपंच पद आरक्षण सोडत प्रक्रियेवेळी व्यासपीठावर तहसीलदार अजय पाटणे, नायब तहसीलदार आनंद मालवणकर व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विविध गावचे सरपंच, तसेच नुकत्याच निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींचे विजयी उमेदवार व इतर उपस्थित होते. यावेळी भंडारी ए. सो. हायस्कुलचा विद्यार्थी सम्राट राजे याच्या हस्ते सोडतीच्या चिठ्ठ्या काढून आरक्षणे जाहीर करण्यात आली. जाहीर झालेली सरपंच पदाची आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे- अनुसूचित जाती राखीव- चौके, बांदिवडे खुर्द, वायंगणी, अनुसूचित जाती स्त्री राखीव- नांदोस, काळसे. अनुसूचित जमाती राखीव- सुकळवाड. नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) सर्वसाधारण- चिंदर, देवली, आडवली-मालडी, गुरामवाड, पळसंब, आंबेरी, असरोंडी, बुधवळे-कुडोपी, साळेल, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला राखीव- कातवड, ओवळीये, मर्डे, वडाचापाट, तोंडवळी, किर्लोस, चाफेखोल, श्रावण, आनंदव्हाळ. सर्वसाधारण – कांदळगाव, कुणकावळे, देऊळवाडा, नांदरुख, गोळवंण, हडी, महान, देवबाग, निरोम, हिवाळे, पोईप, आचरा, वायरी, खोटले, बांदिवडे बुद्रुक, त्रिंबक, मठ बुद्रुक, रेवंडी, रामगड, वेरळ, सर्वसाधारण महिला राखीव- माळगाव, वायंगवडे, धामापूर, कोळंब, वराड, हेदुळ, मालोड, मसदे-चुनवरे, गोठणे, बिळवस, तिरवडे, शिरवंडे, घुमडे, तळगाव, असगणी, पेंडूर-खरारे, तारकर्ली-काळेथर, कुंभारमाठ, आमडोस, सर्जेकोट-मिर्याबांदा, राठीवडे.
*तालुक्यातील ६५ ग्रामपंचायत सरपंच पदाची सोडत तहसीलदार पाटणे यांच्या उपस्थितीत संपन्न
