कोरोना योद्धा म्हणून ग्रामपंचायत कडून सन्मान
*💫मालवण दि.२८-:* मालोंड ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात स्थानिक पातळीवरील आरोग्य कर्मचारी, आशाताई, व ग्रामपंचायत यांचे एकत्रित प्रयत्नामुळे कोरोना काळात साथरोग प्रसार प्रतिबंध करता आला. आरोग्य विभागाने केलेल्या कार्याची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने मालोंड ग्रामपंचायत येथे प्रजासत्ताक दिनी झेंडावंदनाचा मान गाव पातळीवर काम करणाऱ्या आशाताई श्रीम दिव्या बाबुराव जोशी यांना देऊन त्यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोव्हीड १९ जागतिक महामारी कालावधीत आरोग्य विभागाने केलेल्या अथक प्रयत्नाने साथरोग नियंत्रण ठेवण्यासाठी मोलाची भूमिका बजावली होती. यावेळी सरपंच वैशाली घाडीगांवकर, ग्राम सदस्य प्रेरणा पुजारे, समीक्षा तांडेल, ग्रामसेवक भगवान जाधव, सुहास सुर्वे, जयवंत पाटकर, पोलीस पाटील पांडुरंग तांडेल, सुभाष परब, आरोग्य सेवक मुसळे, श्रीमती गावकर, स्वप्नील घाडीगांवकर व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
