भाजपा युवा मोर्चाने केले माजी खासदार निलेश राणेंचे जंगी स्वागत…

*💫कणकवली दि.२८-:* भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी निवड झालेल्या माजी खासदार निलेश राणे यांचे भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कणकवलीत जंगी स्वागत केले. माजी खासदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात युवा कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी केली आहे. खासदारकीच्या काळात अनेक युवकांना महत्वाची राजकीय पदे देऊन प्रकाशझोतात आणले. कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारा आपला हक्काचा नेता म्हणून निलेश राणे यांची ओळख आहे. माजी खासदार निलेश यांची भाजपा प्रदेश सचिवपदी निवड झाल्यानंतर प्रथमच त्यांचे कणकवलीत आगमन झाले. नरडवे नाका येथे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गणेश तळगावकर, तालुकाध्यक्ष नितीन पाडावे यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, परेश कांबळी, सनी पाताडे, समर्थ राणे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page