मंदार सांबारी यांना पुणे येथील मानाचा नक्षत्र गौरव पुरस्कार जाहिर

१८सप्टेंबरला होणार पुणे येथे वितरण

⚡मालवण ता.०५-:
आचरा व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष आणि प्रसिद्ध कवी मंदार सांबारी यांना नक्षत्रांचे देणे काव्यमंच मुख्यालय पुणे यांच्यावतीने यावर्षीचा मानाचा समजला जाणारा नक्षत्र गौरव पुरस्कार २०२२ जाहिर झाला असून संस्थेचे संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र सोनावणे यांनी तो जाहिर केला आहे. सदर पुरस्कार १८सप्टेंबरला पूणे येथे होणाऱ्या २३व्या राज्यस्तरीय श्रावणी काव्य मैफल स्पर्धेत वितरीत केला जाणार आहे.

मंदार सांबारी यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्याचे व्यापारी संघटनेचे पदाधिकारी अर्जुन बापर्डेकर जयप्रकाश परुळेकर, माणिक राणे पंकज आचरेकर यांसह सर्व कार्यकारिणी सदस्य, सर्व व्यापारी वर्गाकडून तसेच साहित्यिक सुरेश ठाकूर,रामेश्वर वाचनालयाचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page