वेंगुर्ला तालुक्यातील निवृत्त शिक्षकांचा जिल्हा परिषद कडून सत्कार …

वेंगुर्ला प्रतिनिधी-भाजपाच्या रेडी जिल्हापरिषदेच्यावतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून आज वेंगुर्ला तालुक्यातील निवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

  यामध्ये शिरोडा येथील अ.वि.बावडेकर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक प्रकाश शिरोडकर यांचा त्यांच्या कुटुंबियांसमवेत सरपंच मनोज उगवेकर, उपसरपंच राहूल गावडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन तर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माजी शिक्षक मनोहर होडावडेकर गुरुजी यांचा भाजप शिरोडा शहर अध्यक्ष श्रीकृष्ण धानजी व उपाध्यक्ष संतोष अणसूरकर यांच्या हस्ते तसेच माजी शिक्षक दिवाकर शिरोडकर यांचा भाजपाचे शिरोडा येथील ज्येष्ठ पदाधिकारी अनिल गावडे, चंद्रशेखर गोडकर, रेडी आरवली शक्तीकेंद्र प्रमुख जगन्नाथ राणे, महादेव नाईक व रेडी येथील भाजपाचे पदाधिकारी पृथ्वीराज राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे उपस्थित होते.
You cannot copy content of this page