गणपती दर्शन घेवून परतत असताना झालेला अपघातात एकाचा मृत्यू

एक किरकोळ जखमी;शिरोडा मिठागर राऊतवाडी येथील घटना

वेंगुर्ले

     रेडी येथून मित्राच्या घरी गणपतीचे दर्शन घेऊन शिरोडा येथे घरी परतत असताना शिरोडा मिठागर राऊतवाडी येथे भरधाव वेगाने गाडी चालवित असताना गाडीवरील नियंत्रण सुटून एका दुचाकीला अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला.तर एकजण किरकोळ जखमी झाला.ही घटना आज शनिवारी ३ सप्टेंबर रोजी दुपारी ११.४५ वा. घडली.

     याबाबत वेंगुर्ले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद रफिक पाकजादे (वय १९) रा.शिरोडा रामदासवाडी व कौस्तुभ धानजी हे (क्र.एमएच ०७ एम -६१५६ ) या दुचाकीने रेडी येथून मित्राच्या घरी गणपती दर्शन घेऊन परतत असताना शिरोडा मिठागर राऊतवाडी येथे गाडी वेगात चालवित असताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी डाव्या बाजूला रस्त्याच्या खाली उतरुन स्लिप होऊन रस्त्याच्या बाजूच्या सिमेंटच्या मैल दगडाला आढळून मोहम्मद पाकजादे हा गंभीर जखमी झाला व कौस्तुभ धानजी हा किरकोळ जखमी झाला.यावेळी स्थानिकांनी गंभीर जखमीला त्वरित शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले.या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अतुल जाधव, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आर.बी.दळवी, पोलिस नाईक योगेश राऊळ यांनी घटनास्थळी दाखल झाले.या घटनेची खबर रफिक कासिम पाकजादे यांनी वेंगुर्ले पोलिसात दिली आहे.याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक विनायक केसरकर हे करीत आहेत.    
फोटो –

You cannot copy content of this page