निवृत्तीवेतन गणेश चतुर्थी पूर्वी केले अदा

निवृत्ती वेतन धारकांनी मानले बँक व्यवस्थापकाचे आभार

मालवण (प्रतिनिधी)

निवृत्तीवेतन गणेश चतुर्थी पुर्वी न मिळाल्याने सिंधुदुर्ग जिल्हा बँक व्यवस्थापकांशी संपर्क साधून व्यवस्था करण्याची केलेली मागणी बँक व्यवस्थापकांनी तातडीने पुर्ण केल्याबद्दल निवृत्तीवेतन धारक संघटनेतर्फे बँक व्यवस्थापनाचे आभार व्यक्त करण्यात आले.

सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन गणपती सणापूर्वी मिळावी या हेतुने शासनाने वेळीच आदेश निर्गमित केले. परंतु जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे गणपती सणा पूर्वी निवृत्तीवेतन निवृत्तीवेतनधारकांना मिळू शकले नाही. त्यामुळे गणपती सणामध्येतरी निवृत्तीवेतन मिळावे या हेतूने सेवानिवृत्त ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी प्रकाश राणे, हनुमंत प्रभू, पी. बी. राणे, जाधव आदी पदाधिकारी यांनी शुक्रवारी जिल्हा बँक अध्यक्ष मानिष दळवी यांची दुरध्वनी द्वारे संपर्क करून व बँक व्यवस्थापन प्रल्हाद गावडे यांची प्रत्यक्ष भेट घेवून आजच्या आज निवृत्तीवेतन धारकांची पेन्शन त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल असे नियोजन करावे न पेक्षा बँकेने बिनव्याजी अग्रिम द्यावी, अशी विनंती केली. व्यवस्थापक गावडे साहेब यांनी लागलीच त्याची दखल घेवून सर्व तालुक्याच्या शाखाधिकाऱ्यांशी दुरध्वनीद्वारे संपर्क करून सदरची रक्कम २ तारीखलाच सर्व निवृत्तीधारकांच्या खात्यात जमा करण्यात यावी अशा प्रकारचे नियोजन करून निवृत्तीधारकाना दिलासा दिला. त्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी बँक अध्यक्ष व व्यवस्थापक यांचे आभार मानले आहेत. यावेळी बँक अधिकारी पडेलकर हेही उपस्थित होते.

You cannot copy content of this page