शिक्षण मंत्री दीपक केसरकर; विकासासाठी एकत्र येणे गरजेचे…
⚡सावंतवाडी ता.३०-: वाईट विचार संपवून चांगले विचार पुढे घेऊन जाताना वैचारिक मतभेद राज्याच्या तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी संपवणे आणि एकत्र येऊन विकास करणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आता भयमुक्त झाला असून, ही जिल्ह्यासाठी चांगली बाब आहे, असे मत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केले आहे.
