मी जो आहे तो माझ्या कार्यकर्त्यांमुळेच

भाजपचे प्रदेश सचिव डॉ. निलेश राणे यांचे प्रतिपादन

*💫सावंतवाडी दि.१८-:* आम्ही आज ज्या पदावर आहोत ते फक्त आणि फक्त आमच्या सहकार्यामुळेच आहोत असे मत माजी खासदार तथा भाजप नेते निलेश राणे यांनी सावंतवाडी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे. भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी आपल्यावर जबाबदारी देत दाखवलेला विश्वास हे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा आशीर्वाद असल्याचे देखील ते म्हणाले आहेत. त्यामुळे पक्षांनी दाखवलेले विश्वास आपण सार्थकी ठरवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी ते म्हणाले की, मी स्वतः नेहमी कार्यकर्त्यांसोबत राहून, त्याच्यासोबत वावरलो आहे. मी कधीच स्वतःला नेता समजत नाही. लाल दिव्याच्या गाडीचे मला ओढ नाही असे देखील ते म्हणाले आहेत. यावेळी महाराष्ट्रात सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेले ठाकरे सरकार महाराष्ट्रातून घालवण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

You cannot copy content of this page