चिरे वाहतूक करणारा ट्रक खोल दरीत कोसळून अपघात

सुदैवाने जीवितहानी नाही

*💫आंबोली दि२८ विष्णू चव्हाण -:* येथील घाटात चिरे वाहतूक करणारा ट्रक वीस ते पंचवीस फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.तर संबंधित ट्रक अद्यापही अपघातग्रस्त ठिकाणी पडून आहे. हा अपघात काल बुधवारी सायंकाळच्या सुमारास कुंभेश्वर परिसरात घडला. याबाबत अधिक माहिती अशी की,अपघाताच्या ठिकाणावरून मिळालेल्या माहितीनुसार त्यातून चिर्‍यांची वाहतूक होत होती.दरम्यान तो कुंभेश्वर परिसरात आला असता सावरीच्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने तो दरीत कोसळला.याच ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

You cannot copy content of this page