शहर भाजपकडून करण्यात आले स्वागत*
*💫सावंतवाडी दि.२८-:* माजी खासदार निलेश राणे यांची भाजप प्रदेश सचिव पदी नियुक्ती झाल्यानंतर ते आज प्रथमच सावंतवाडी दौऱ्यावर आले असून, शहर भाजपतर्फे त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी तसेच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आहे.
यावेळी नगराध्यक्ष संजू परब, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक तथा आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेवक तथा माजी आरोग्य सभापती अँड परिमल नाईक, नगरसेवक मनोज नाईक, बंटी पुरोहित, संतोष गावस, दिलीप भालेकर, परिणीती वर्तक, मोहिनी मडगावकर आदी पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
