मालवण दि प्रतिनिधी
कृषि व अन्नप्रक्रीया संचालनालय, कृषि आयुक्तालय महाराष्ट्र राज्य याच्या अंतर्गत जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालय सिंधुदुर्ग आणि प्रादेशिक फल संशोधन केंद्र वेगुर्ला याच्या सयुवत विद्यमाने तिन दिवशीय मोफत अन्न व फल प्रक्रियेवर आधारीत क्षमता बांधणी तथा उद्योजकता विकास कार्यक्रम प्रादेशिक फल संशोधन केंद्र वेगुर्ला येथे दि. २५ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.
ज्याना फळ,अन्न प्रक्रियेवर आधारीत स्वत:चा व्यवसाय करायचा आहे अशा साठी मोफत तज्ञ अधिकारी, उद्योग सल्लागार, याच्या मार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. किमान वय १८ वर्षे पुर्ण, बेरोजगार युवक, युवती, महिला बचत गट, शेतकरी, भागिदारी संस्था, शेतकरी उत्पादक गट/कंपनी या प्राथमिक प्रशिक्षणात सहभागी होवू शकतात. ज्याना अन्न,फळ प्रक्रीयेवर उद्योग करायचा आहे.त्याच्या उद्योग उभारणीसाठी,प्रकल्प अहवाल तयार करण्यास या योजने अंतर्गत मोफत मेन्टार (रिसोर्स पर्सन)उपलब्ध करून देण्यात येणार असून ज्यानी अन्न, फल प्रक्रियेवर उद्योग करायचा ठाम निर्णय झाला आहे ते या प्रशिक्षणात सहभागी होवू शकतात. या योजने अंतर्गत ३५ टक्के अनुदान कमाल १० लाख मर्यादित ते असेल.
नव उद्योजकाला स्वता ची १० ते ४० टक्के पर्यत स्व गुंतवणूक करणे या योजनेत नमूद केले असून उर्वरित बॅक कर्जाचा समावेश असेल. लाभार्थी हा बॅकेचा थकबाकीदार नसावा.
प्रशिक्षण यशस्वी पुर्ण करणा-या प्रशिक्षणार्थीना प्रती रू 500/स्टायपेड देण्यात येणार असून प्रशिक्षण यशस्वीतेचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. इच्छूक नवउद्योजक प्रशिक्षणार्थीना खालील गुगल लिंक वर आपला प्रवेश अर्ज https://forms.gle/p5mKRMLBfvgq3eED6 दि.२४ ऑगस्ट पर्यत सादर करावा असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालया मार्फत आवाहन करण्यात येत आहे
