भाजप नेते दत्ता सामंत यांनी केले होते आयोजन;भाजप प्रदेश सचिव निलेश राणे राहणार उपस्थित
मालवण दि प्रतिनिधी
श्रीदेवी घुमडाई मंदिर घुमडे येथे श्रावण मास निमित्ताने उद्योजक दत्ता सामंत यांच्या वतीने जिल्हास्तरीय निमंत्रित बुवांची भजन स्पर्धा १३ ते १६ ऑगस्ट या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा भाजप नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत मंगळवार २३ ऑगस्ट सायंकाळी ७ वाजता घुमडाई मंदिर येथे संपन्न होणार आहे.
हरी नामाची सेवा घडून भजन रसिकांना हरिनामाचा गोड आस्वाद मिळावा याच उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्या मंडळास अनुक्रमे ११,१११ रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, ७,७७७ रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, ५,५५५ रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, उत्तेजनार्थ प्रथम ३,३३३ रुपये, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक, द्वितीय २,२२२ रुपये, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक, तृतीय १,१११ रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. यासह सर्वोत्कृष्ट गायक, मृदुंगमणी, झांज वादक, कोरस यासह अन्य बक्षिसे आहेत. अशी माहिती घुमडे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष दत्ता सामंत यांनी दिली आहे.
