स्वतः आमदार असताना पत्नीला नगराध्यक्ष केल्याचा केसरकराना विसर

उद्धव ठाकरे यांच्यावरील टिकेवरून जिल्हा प्रवक्ते डॉ परुळेकर यांचा प्रश्न

⚡सावंतवाडी ता.२१-: एकाच घरात मुख्यमंत्री पद आणि मुलाला मंत्रीपद कसे दिले अस विचारणाऱ्या केसरकरांना स्वतः आमदार असताना स्वतःच्या पत्नीला नगराध्यक्ष केले होते. याचा विसर पडला आहे का? असा सवाल शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, शिवसेनेचे युवराज संभाजीराजे यांना करारनाम्यावर सही करण्यास सांगून त्यांचा अपमान केला असे सांगणाऱ्या केसरकरांना भाजपने संभाजीराजेंना खासदारकी नाकारली हे विसरले का? असा प्रश्न विचारला आहे. भाजपला त्यांना खासदारकी देऊन त्यांना खासदार करणे सहज शक्य होते. परंतु, तसे न करता भाजपनेच खऱ्या अर्थाने त्यांचा अपमान केला असा आरोप केला आहे.

You cannot copy content of this page