*💫कणकवली दि२७-:* प्रजासत्ताकदिनी जिल्ह्यात ३०० हून अधिक उपोषण झाली. सिंधुदुर्गच्या इतिहासात हे प्रथमच घडले असून नाकर्त्या पालकमंत्री आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करतो अशा शब्दांत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी चिमटे काढले. जिल्ह्यात शिवसेना रुजवणाऱ्या सतीश प्रभू या वयोवृद्ध शिवसैनिकांला उपोषण छेडावे लागले. भाजपा या सर्व ३०० उपोषणकर्त्याना न्याय देण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या दिशेकडे चालला आहे याचे आत्मपरीक्षण सत्ताधाऱ्यांनी करावे असा टोला भाजपा जिल्हाध्यक्ष तेली यांनी लगावला. आपल्यावरील पोलीस केस मागे घ्या अन्यथा ऍट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तसा गुन्हा दाखल केला जातो. सत्तेचा दुरुपयोग केला जात असल्याची टीकाही तेली यांनी केली.
300 उपोषण करायला लावणाऱ्या पालकमंत्र्यांचे अभिनंदन – राजन तेली
