सैनिक होण्यासाठी शारीरिक क्षमतेसोबत मानसिक क्षमतेची गरज

निवृत्त कॅप्टन दिनानाथ सावंत
कलंबिस्त हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतली प्रकट मुलाखत

सावंतवाडी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत कलंबिस्त हायस्कूलमध्ये माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष माजी कॅप्टन दिनानाथ लक्ष्मण सावंत यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कॅप्टन दिनानाथ सावंत यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.


यावेळी त्यांनी तत्कालीन परिस्थितीत आपण घरातील मंडळींच्या प्रोत्साहनामुळे व गावातील सैनिकी परंपरेमुळे सैन्यात भरती झालो, असे सांगत आपल्या भरतीपासूनच्या ते प्रत्यक्षात सीमेवर सैनिक म्हणून काम करतानाच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सैन्यात भरती होण्यासाठी आवश्यक बाबींचे महत्व सांगत सरकारच्या सध्याच्या सैन्यभरतीच्या नव्या योजनांबद्दलही माहिती दिली.
प्रशालेचे वरीष्ठ लिपीक विष्णू पास्ते यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. प्रशालेतील इयत्ता नववीतील विद्यार्थीनी आर्या सावंत व तन्वी पास्ते या विद्यार्थीनींनी समर्पक प्रश्न विचारत कॅप्टन सावंत यांची मुलाखत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर वालावलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन विनीता कविटकर यांनी केले.

You cannot copy content of this page