माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी देवगड काँग्रेस कडून साजरी

देवगड
भारताचे माजी पंतप्रधान संगणकीय प्रणालीचे प्रणेते स्वर्गीय राजीव गांधी यांची पुण्यतिथी देवगड तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने देवगड काँग्रेस कार्यालयात साजरी करण्यात आली .
यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.या प्रसंगी
देवगड तालुका अध्यक्ष उल्हास मणचेकर,सरचिटणीस सजाउद्दीन सोलकर,शहर अध्यक्ष उमेश कुळकर्णी,माजी प.स.सदस्य अरविंद भोगले, सदस्य तुषार भाबल, गणपत वालकर उपस्थित होते.
आज संपूर्ण भारत डीजिटल युगाकडे वाटचाल करीत असून आजच्या युगाची खरी सुरुवात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळातील संगणकीय प्रणाली पासून सुरू झाली आहे.अशा शब्दात उपस्थित पदाधिकारी यांनी आदरांजली व्यक्त केली.

You cannot copy content of this page