संजू परब युती सरकारचे आमदार होतील

शिक्षण मंत्री दीपक केसरकर : यापुढे माझा पाठींबा असेल

⚡सावंतवाडी ता.१९-: संजू परब यांचे आणि माझे घरघुती सबंध आहेत. त्यामुळे यापूर्वी देखील संजू परब यांना माझा पाठिंबा होता. तसेच यापुढे देखील तो राहणार असल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे संजू परब आगामी काळात युती सरकारचे सावंतवाडीचे नगराध्यक्ष किंवा विधानसभा मतदार संघातून आमदार होतील असे सूचक विधान शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ते आज संजू परब यांच्या कार्यालयात आले असताना , त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता.

You cannot copy content of this page