वाढदिन कार्यक्रमात संजू परब यांचे आश्वासन
⚡सावंतवाडी ता.१९-: माझ्या वाढदिनी मला मिळालेल्या शुभेच्छा ह्या आयुष्यात मी कमावलेले जनतेचे प्रेम आहेत, त्यामुळे यापुढेही जनतेसाठी माझे काम अधिक गतिमान करणार तसेच भाजपाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून येणाऱ्या पालिका निवडणूकीत सत्ता खेचून आणण्यासोबत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत पक्षाला विजयाचे गिफ्ट देणार अशी ग्वाही माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आपल्या वाढदिनी कार्यक्रमात मनोगत व्यक्त करतांना दिली.
