राजेश पडवळ चॅरिटेबल ट्रस्ट आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सत्कार…

वैभववाडी संजय शेळके
‌‌कोरोना महामारी नंतर शाळा, महाविद्यालय, उद्योगधंदे, व्यवसाय सर्व काही पुर्व पदावर आल्यानंतर गेल्या काही महिन्यांमध्ये वैभववाडी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही विद्यार्थी व इतर व्यक्तींनी आपल्या कार्यातून एक आदर्श इतरांपुढे ठेवला अशा गुणवंतांचा गुणगौरव करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्याच्या उद्देशाने राजेश पडवळ चॅरिटेबल ट्रस्ट व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या वतीने गुणगौरव व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि.२१ ऑगस्ट २०२२ रोजी आंबेडकर भवन वैभववाडी येथे सकाळी १० वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका होण्याचा मान मिळवलेल्या सिंधुदूर्गच्या रिया आवळेकर यांचा सत्कार तसेच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुणे येथील आर्मी ब्लड बॅंक येथे रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा सत्कार देखील या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. तसेच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान मध्ये सक्रिय काम करणाऱ्या व्यक्ती, शालेय स्तरावर यश संपादन केलेले विद्यार्थी यांचा देखील गुणगौरव या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page