गटनेते सुशांत नाईक यांची समीर नालावंडेना खुली ऑफर
*💫कणकवली दि.२७-:* कणकवली नगरपंचायत चे भाजपाचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांना सर्व दरवाजे बंद झाले तरी शिवसेनेचे दरवाजे खुले असल्याची ऑफर विरोधी गटनेते सुशांत नाईक यांनी दिली. शिवसनेनेच्या नाईक यांनी भाजपा नगराध्यक्ष नलावडे यांना पक्षप्रवेशाच्या दिलेल्या ऑफरमुळे कणकवली शहरातील राजकीय गणिते तर बदलणार नाहीत ना ? अशी चर्चा कणकवली शहरासह जिल्ह्यात सुरू झाली आहे. कणकवली नगरपंचायत च्या आरक्षित जागेतील भाजी मार्केट इमारतीबाबत आमच्या भूमिकेशी भाजपा नगराध्यक्ष समीर नलावडे यांची भूमिका जुळती आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली भागीदार असलेल्या विकासकाच्या चुकीच्या कामाला नगराध्यक्षांनी विरोध केला आहे. कोणाच्याही दबावाखाली नगराध्यक्ष नलावडे यांनी आपली भूमिका बदलू नये. नलावडे यांना भविष्यात सगळे दरवाजे बंद झाले तरी शिवसेनेचे दरवाजे उघडे आहेत अशा शब्दांत भाजपा नगराध्यक्ष समीर नलावडे याना शिवसेना प्रवेशाची खुली ऑफर विरोधी गटनेता सुशांत नाईक यांनी दिली. एप्रिल २०१८ मध्ये झालेल्या कणकवली नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत समीर नलावडे यांनी तत्कालीन भाजपात असलेल्या संदेश पारकर यांचा पराभव केला होता. राणेंनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राणेंसोबत समीर नलावडे व त्यांचे सहकारी नगरसेवक भाजपात प्रवेशकर्ते झाले. तर संदेश पारकर यांच्यासह पारकर गट भाजपच्या तंबूतून शिवसेनेत स्थिरावला. सध्या कणकवली शहरात आरक्षित जागेतील भाजी मार्केट इमारत डेव्हलपमेंट चा विषय कळीचा मुद्दा बनून राहिला आहे. ग्लोबल असोसिइट्स चे भागीदार तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली आहेत. ग्लोबल असोसिइट्स कडून नगरपंचायत शी झालेल्या विकास कराराच्या अटी शर्तींचा भंग झाल्याच्या मुद्द्यावर कणकवली वासीयांच्या हितासाठी नगराध्यक्ष नलावडे यांनी सध्या सुरू असलेल्या भाजी मार्केट डेव्हलपमेंट हरकत घेतली आहे. अटींची पूर्तता करा नंतरच काम सुरू करा अशी नगराध्यक्ष नलावडे यांची भूमिका आहे. या मुद्द्यावरून सध्या भाजपा जिल्हाध्यक्षांच्या विरोधात कणकवली नगरपंचायत मधील सत्ताधारी भाजपाचे नगराध्यक्ष असे चित्र कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झाले आहे. त्याचीच संधी साधत कणकवली नगरपंचायत चे शिवसेनेचे विरोधी गटनेते सुशांत नाईक यांनी स्टेटमेंट करताना नगराध्यक्ष नलावडे यांनी भाजी मार्केट डेव्हलपमेंट प्रश्नी कणकवलीवासीयांच्या हिताच्या दृष्टीने आपल्या सध्याच्या भूमिकेशी स्टिकअप राहावे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या दबावाखाली येऊन आपल्या भूमिकेशी तडजोड करू नये. प्रसंगी सर्व दरवाजे बंद झाले तरी भाजपाचे दरवाजे खुले आहेत अशी खुली ऑफर देत खळबळ उडवून दिली आहे.
