जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कै. सौ. सुधाताई वामनराव कामतचा विद्यार्थी चिन्मय कोटणीस प्रथम

⚡सावंतवाडी ता.१८सहदेव राऊळ -: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त इन्सुली येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेत कै. सौ. सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नं. २ च्या इयत्ता पाचवीतील कु. चिन्मय विक्रम कोटणीस याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.

उत्कर्ष युवक कला क्रीडा, व्यायाम मंडळ इन्सुली डोंबाळ शेत पुरस्कृत आणि विद्या विकास मंडळ इन्सुली संचालित नुतन माध्यमिक विद्यालय इन्सुली आयोजित ही स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात चिन्मय कोटणीस याने यश प्राप्त केले आहे. चिन्मय कोटणीस याने बऱ्याच स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

You cannot copy content of this page