राष्ट्रवादीला प्रामाणिक राजकारणातून पुन्हा गतवैभव देण्याचा ध्यास घेतलेला नेता

सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा वाढदिवस आज होतोय उत्साहात साजरा

सावंतवाडी- विनय वाडकर

माणसाच्या मनात जिद्द असली की, कोणतीच ताकद त्याला अडवू शकत नाही. असे म्हणतात. हे वाक्य खरे करून दाखवले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी. तालुक्यातून संपुष्टात येत असलेल्या राष्ट्रवादीला आपल्या अपार कष्ट, जिद्द, चिकाटी, मेहनत आणि प्रमानिकपणा यांच्या बळावर पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ग्लोबल महाराष्ट्र ने घेतलेला हा धावता आढावा…

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सावंतवाडी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने पक्षाला सुरुंग लागला. आणि एकेकाळी सावंतवाडी शहरातच नव्हे तर तालुक्यात एक हाती सत्ता स्थापन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला उतरती कळा लागली. त्या मोठ्या नेत्याच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस हा तालुक्यात नावापुरताच उरला होता. परंतु, अशा पडत्या काळात देखील पक्षाध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर विश्वास ठेऊन आणि सावंतवाडी विधानसभा पक्षनिरीक्षक अर्चना घारे परब यांच्या नेतृत्वाखाली पुंडलिक दळवी यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. राजकारणात येतं त्यांनी लोकांच्या समस्या सोडविण्यास सुरुवात केली. प्रसंगी आक्रमक होत अधिकाऱ्यांना जाब विचारला, अनेकांचे प्रश्न सोडविण्यास पुढाकार घेतला, त्यांच्या या बाणेदार पणावर प्रभावित होऊन अनेक युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यास सुरुवात केली. एकवेळ तालुक्यातून संपुष्टात यायला निघालेली राष्ट्रवादी काँग्रेसच्या सच्चा आणि प्रामाणिक “पुंडलिकानी” तारून नेली. सावंतवाडी तालुक्यात राष्ट्रवादीला नवसंजीवनी राष्ट्रवादीच्या “पुंडलिकाने” दिली.

कोणत्याही पदाची अपेक्षा न बाळगता पक्ष वाढवा म्हणून त्यांनी आपले काम प्रामाणिकपणे सुरूच ठेवले होते. प्रामाणिक माणसाला त्याच्या प्रमाणिक पणाचे फळ देव नक्कीच देतो. त्याचप्रमाणे पुंडलिक दळवी यांना देखील त्यांच्या प्रमाणिक पणाचे फळ मिळणारच होते. एक व्यापारी असल्याने व्यापाऱ्यांच्या समस्या त्यांना चांगल्याच समजत होत्या. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास दाखवत आणि ते करत असलेल्या कामाची पोच पावती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्योग व व्यापार सेलची जिल्हाध्यक्ष पदाची माळ त्यांच्या गळ्यात घातली.

समाजसेवेचे बाळकडू घरातूनच मिळाल्याने लहानपणापासूनच समाजसेवेची ओढ त्यांना होती. अपार कष्ट, जिद्द, चिकाटी, मेहनत आणि प्रमाणिकपणा यांच्या बळावर त्यांनी आपले वेगळे अस्तित्व आज निर्माण केले आहे. संघटना वाढीसाठी दिवस रात्र एक करून, प्रसंगी स्वतच्या खिशातील पैसे खर्च करून पक्ष वाढावा यासाठी ते दिवस रात्र मेहनत घेत आहेत. आणि याच निष्ठेवर खुश होत त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदाची धुरा सोपविण्यात आली. आपण पुढे जात असताना आपल्या सोबतच्या व्यक्तींना देखील पुढे घेऊन जाण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे त्यांना माणसं आपसूकच जोडत आहेत. आज जिल्ह्यात त्यांनी आपल्या कार्य शैलीने वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज अनेक युवक त्यांच्याकडे आकर्षित होत असून, त्यांच्या सोबत काम करण्यासाठी तयार झाले आहेत. आणि त्यामुळेच तालुक्यातून संपलेली राष्ट्रवादी पुन्हा उभी राहिली आहे. राष्ट्रवादीला पुंडलिक दळवी यांनी पुन्हा एकदा सोन्याचे दिवस दाखवले आहेत. आज विरोधक देखील राष्ट्रवादी काँग्रेसला आपला कट्टर विरोधक मानत आहेत.

तालुकाध्यक्ष पद मिळाल्यानंतर तर दळवी यांची जबाबदारी आणखी वाढली आहे. शहरासह तालुक्यातील विविध समस्यांवर त्यांनी वारंवार आवाज उठवला. जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांसह प्रशासकीय अधिकारी यांच्या विरोधात आंदोलन देखील केलीत. परंतु, हे त्यांना सर्व शक्य होत आहे ते केवळ त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या भक्कम साथीमुळे.

पुंडलिक दळवी यांचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते सावंतवाडी तालुकाध्यक्ष हा सर्व प्रवास थक्क करणारा असाच आहे. त्याचं संयमी, कुशल नेतृत्व भल्या भल्यांना भुरळ घालत आहे. सावंतवाडीच्या राजकीय पटलावर त्यांनी आपल्या कर्तुत्वाने एक वेगळी छाप सोडली असून, विरोधकांच्या काळजात धडकी भरवली आहे. अशा या दमदार आणि तडफदार सर्वसामान्याच्या नेत्याला ग्लोबल महाराष्ट्र कडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या…!

You cannot copy content of this page