बांदा ता.१७-:
बांदा निमजगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आज युवा प्रतिष्ठान संस्था नाटळ यांच्या माध्यमातून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आणि संजना सावंत यांच्याकडून वह्या आणि खाऊचे वाटप करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा परिषद चे माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत यांनी विशेष प्रयत्न केले होते.
यावेळी उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री संदीप बांदेकर, बांदा तंटामुक्ती अध्यक्ष श्री. गुरुनाथ सावंत, माजी सरपंच बाळा आकेरकर, माजी ग्रा पं. सदस्य श्री ज्ञानेश्वर सावंत, माजी सरपंच डेगवे मधुकर देसाई, श्री. रत्नाकर आगलावे, श्री राजन सावंत, श्री आत्माराम गावडे, निगूडे सरपंच श्री दिपक नाईक, श्री विनेश गवस ,नीलेश देसाई, कैलास गवस, सौ गायत्री गडेकर, व पालक उपस्थित होते.
