शांतादुर्गा हायस्कूलमध्ये “श्रावणधारा” कार्यक्रम संपन्न

मालवण दि प्रतिनिधी
वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल मध्ये श्रावण मासावर आधारित असणाऱ्या कविता तसेच श्रावण मासाचे सण आजी उत्सव यावर आधारित श्रावणधारा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. चैतन्य, सौंदर्य आणि संस्कृती यांच्या त्रिवेणी संगमाने नटलेल्या श्रावणधारा या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक पी. एच. कुबल यांनी भूषविले होते .

या कार्यक्रमात प्रशालेतील विद्यार्थ्यांनी श्रावण मासावर आधारित कवितांचे काव्यवाचन केले. त्याचप्रमाणे प्रशालेतील विद्यार्थ्यांनी श्रावण मासातील सण नागपंचमी, रक्षाबंधन,नारळी पौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडी, मंगळागौर, जिवती मातेचे व्रत,हरिनाम सप्ताह अशा विविध स्वरूपाच्या कार्यक्रमांतून आपल्या कलागुणांना वाव देत संपूर्ण श्रावण मासाचे वास्तवदर्शी चित्रण प्रेक्षकांच्या समोर उभे केले.
त्याचप्रमाणे प्रशालेत श्रावणधारा आणि आजादी का अमृत महोत्सव या दुहेरी कार्यक्रमाच्या संगमातून गीत गायन स्पर्धा आयोजित केली होती यामध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, भावगीत, भक्तीगीतांचे गायन करून प्रेक्षकांची मने जिंकली.

या स्पर्धेसाठी प्रशालेतील शिक्षिका सौ.वेदिका दळवी व सौ. प्रीती सनये यांनी परीक्षक म्हणून भूमिका बजावली. या कार्यक्रमासाठी प्रशालेतील शिक्षिका कु. प्रतिभा केळुसकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.प्रतिभा केळुसकर यांनी केले. तर आभार प्रशालेतील विद्यार्थिनी कुमारी तनिषा वायंगणकर हिने मानले. या कार्यक्रमाच्या वेळी प्रशालेमध्ये माजी विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page