आ नाईक यांचे लाभ घेण्याचे युवकांना आवाहन
मालवण : (प्रतिनिधी)
मालवण नगरपालिकेच्या फोवकांडा पिंपळ येथील इमारतीत असलेल्या व्यायामशाळेमध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या अत्याधुनिक व्यायाम साहित्य व मशनरिंचे लोकार्पण आज आम. वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. व्यायामशाळेसाठी दर्जेदार असे साहित्य उपलब्ध केले असून उर्वरित जुने साहित्य देखील लवकरच बदलून नवीन उपलब्ध केले जाईल, मालवणच्या युवकांनी या व्यायामशाळेचा लाभ घेऊन बॉडिबिल्डिंग सारख्या स्पर्धांमध्ये यश मिळवावे असे यावेळी आम. नाईक यांनी सांगितले.
व्यायामशाळा येथील साहित्य जीर्ण झाल्याने नवीन साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी येथील व्यायामपटू यांनी तत्कालीन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची भेट घेऊन नवीन व्यायामशाळा साहित्य उपलब्ध करण्याची मागणी केली होती. साहित्य उपलब्धतेसाठी शासन स्तरावरून निधी करून उपलब्ध करून देऊ असा शब्द नगराध्यक्ष यांनी दिला होता. कांदळगावकर यांच्यासह यतीन खोत, मंदार केणी व सहकारी नगरसेवक यांच्या माध्यमातून आमदार वैभव नाईक यांचे लक्ष वेधण्यात आले. शासन स्तरावरून २५ लाख निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार आमदार वैभव नाईक यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला. त्यानुसार शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या उपलब्ध २५ लाख निधीतून अत्याधुनिक असे व्यायामशाळा साहित्य व मशीन व्यायामशाळा येथे उपलब्ध झाली आहेत.
या व्यायाम साहित्याचे लोकार्पण आम. नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, माजी नगरसेवक मंदार केणी, सौ. सेजल परब, सौ. सुनीता जाधव, सौ. शिला गिरकर, आकांक्षा शिरपुटे, मंदार ओरसकर, अमेय देसाई, उमेश मांजरेकर, भाई कासवकर, महेंद्र म्हाडगुत, नंदा सारंग, अंजना सामंत, दीपा शिंदे आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी महेश कांदळगावकर व मंदार केणी यांनी आम. नाईक यांचे आभार मानले. यावेळी बॉडिबिल्डिंग स्पर्धेत यश मिळविणाऱ्या प्रयमेश गावकर विनीत मंडलिक यांचा आम. नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
