*पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या लेखी पत्रानंतर प्रदीप मांजरेकर यांचे आंदोलन स्थगित

*शहरातील मटका, अवैध धंद्यांविरोधातील कारवाईत सातत्य राखण्याचे दिले आश्वासन

*💫कणकवली दि.२७-:* : कणकवली शहरातील मटका, अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरू असून यात सातत्य राखले जाईल असे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी लेखी पत्र दिल्यानंतर काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी आपले लाक्षणिक धरणे आंदोलन स्थगित केले आहे. कणकवली शहरातील मटका आणि अवैध धंद्यांविरोधात राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यासमोरच लाक्षणिक धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. तसे निवेदन कणकवली पोलीस निरीक्षकांना दिले होते.२७ जानेवारीपासून सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत दररोज पोलीस ठाण्याच्या आवारात लाक्षणिक धरणे आंदोलन करणार होते. मात्र मांजरेकर यांनी दिलेले निवेदन लक्षात घेत जानेवारी महिन्यात कणकवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेकायदा दारू धंद्यांवर २, मटका बुकिंवर ९ तर गांजाविक्री करणाऱ्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरासह जिल्ह्यातील सर्व व्हिडिओ गेम पार्लरचे लायसन्स रिन्युअल झालेले नाही आहे. व्हिडीओ गेम पार्लरवरील कारवाईबाबत वरिष्ठ स्तरावर कायदेशीर मार्गदर्शन घेण्यात येत आहे. वरिष्ठांच्या आदेशानंतर व्हिडीओ गेम पार्लरवरही कारवाई केली जाईल.अवैध धंद्याविरोधातील ही कारवाई यापूढेही अशीच सुरू राहील असे लेखी आश्वासन कणकवली पोलीस निरीक्षकांनी दिल्यानंतर मांजरेकर यांनी आपले लाक्षणिक धरणे आंदोलन स्थगित केल्याची माहिती दिली.

You cannot copy content of this page