Headlines

तर स्वखर्चाने खड्डे बुजविणयात येईल

भाजप नेते दत्ता सामंत यांचा सार्वजनिक बांधकामला इशारा;तारकर्ली – देवबाग रस्त्याबाबत वेधले लक्ष

मालवण (प्रतिनिधी)
पर्यटन दृष्ट्या महत्वपूर्ण मानल्या गेलेल्या तारकर्ली- देवबाग रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याबाबत भाजपचे दत्ता सामंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधताना येत्या आठ दिवसात येथील खड्डे बुजवण्यात यावे अन्यथा आठ दिवसांत खड्डे बुजवले नाही तर स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे बुजवून देऊ, असा शब्द श्री सामंत यांनी ग्रामस्थांना दिला आहे. गेले काही महिने राजकारणापासून अलिप्त राहिलेले भाजपचे दत्ता सामंत हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घोषित झाल्यानंतर पुन्हा सक्रिय झाल्याने श्री सामंत यांची सक्रियता ही तालुक्यात चर्चेचा विषय बनली आहे

सोमवारी दत्ता सामंत यांनी देवबाग मधील बंधारा आणि खड्डेमय रस्त्याची पाहणी केली. यावेळी मंदार लुडबे, ग्रा. प. सदस्य नितिन बांदेकर, सौ. धुरी, दत्ता चोपडेकर, संकेत राऊळ, अक्षय वालावलकर, नाना तांडेल, पंकज मालंडकर, विलास बिलये, बाबु कासवकर, मोहन कुबल, संतोष पराडकर, बाबा कुमठेकर आदी ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी देवबाग गावातील खड्डेमय रस्त्याविषयी बांधकामाचे उपअभियंता अजित पाटील यांच्याशी संपर्क केला. यावेळी श्री. पाटील यांनी येत्या आठ दिवसांत देवबाग गावातील रस्त्याचे खड्डे बुजविले जातील, असे सांगितले. जर येत्या आठ दिवसांत खड्डे बुजविले नाहीत तर स्वखर्चाने देवबाग गावातील रस्ते आपण बुजवून देऊ, असा शब्द दत्ता सामंत यांनी देवबाग गावातील ग्रामस्थांना दिला आहे. त्याचप्रमाणे बंधारा ठेकेदाराला देखील यावेळी कामाबाबत सूचना दिल्या. दत्ता सामंत यांच्या या भूमिकेचे देवबाग मधील भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.

दरम्यान, गणेश चतुर्थी सण तोंडावर आला असून गावागावात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. अशावेळी प्रत्येक जिल्हा परिषद विभागात भाजपा कार्यकर्त्यांनी श्रमदानातून रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, त्यासाठी प्रत्येक विभागात आपण स्वखर्चाने ५० पोती सिमेंटसह तालुक्यात दोन ते तीन लाखांची खडी मोफत उपलब्ध करून देऊ, असे दत्ता सामंत यांनी जाहीर केले आहे.

You cannot copy content of this page