⚡कणकवली ता.१६-: मिळून साऱ्याजणी महिला मंचच्यावतीने कणकवली शिवशक्ती हॉल येथे मंगळवारी श्रावणसरी हा फुगड्यांचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचा शुभारंभ “नवा गडी नवे राज्य” मालिकेतील अभिनेत्री दीक्षा पूरळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला.
मिळून साऱ्याजणी मंचच्या संस्थापिका नीलम सावंत – पालव यांच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमात अगदी लहान मुलींपासून वृद्ध ज्येष्ठ महिलाही सहभागी झाल्या होत्या. सर्व महिलांनी मिळून फुगड्यांचा फेर धरला तसेच श्रावण महिन्यातील वृत्तवैकल्याचे महत्त्व विशद केले.
