सुदैवाने जीवितहानी नाही; मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान
बांदा /प्रतिनिधी
बांदा -सावंतवाडी मार्गावर इन्सुली येथील संत सोहिरोबानाथ आंबीये मंदिरासमोर भरधाव वेगात ट्रक झाडाला आदळून अपघातग्रस्त झाला. या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र ट्रकच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा अपघात आज दुपारी झाला.
. ट्रक चालक लोखंडी सामान घेऊन मुंबईतून गोव्याच्या दिशेने जातं होता. दुपारी इन्सुली घाटिच्या खाली भरधावं वेगात चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक मंदिरासमोरील झाडावर जाऊन आदळला. यामध्ये ट्रकचे नुकसान झाले.
